नागपूर: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नागपूरकर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खाते आले. त्यांनी लगेच नागपूरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन आपल्या पुढील कामकाजाची दिशा कशी असेल हे स्पष्ट केले. त्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचाही मुद्दा महत्त्वाचा होता. बदल्यांसाठी नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना यापुढे मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सर्व बदल्या नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने होतील. बदल्यांमधील भ्रष्टाचारावर अंकुश लावला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

अधिकाऱ्यांच्या बदल्या, रेतीलिलाव आणि दस्तनोंदणी या तीन प्रमुख मुद्द्यांवर आपण प्राधान्याने काम करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या अत्यंत महत्त्वाच्या खात्याची नव्याने घडी बसविण्याचा प्रयत्न केला जाईल. असे ते म्हणाले. सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी दिली आहे. साध्या-साध्या गोष्टीसाठी जनतेला शासनाच्या विविध कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. यात महसूल विभागाशी त्यांचे अनेक प्रश्न संबंधीत असतात. हे लक्षात घेता ग्रामीण भागातील तलाठी पासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जबाबदार व तेवढ्याच तत्पर प्रशासनाची जनतेला अपेक्षा आहे. प्रशासकीय यंत्रणेने आपल्या कार्यपध्दतीला गतिमान करुन आपली जबाबदारी वेळेत पूर्ण करण्यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ती संसाधने शासनातर्फे उपलब्ध करु असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

हेही वाचा : महानिर्मितीचा पदभरती रखडलेली, दोन वर्षांपासून बेरोजगार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी अपर महसूल आयुक्त डॉ.माधवी खोडे, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, राजलक्ष्मी शहा, उपायुक्त सर्वश्री डॉ.कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, मनोज शहा, अनिल गोतमारे, अनिल बनसोड, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे तसेच विविध विभाग प्रमुख  उपस्थित होते.