scorecardresearch

Premium

बुलढाणा : खामगाव जालना महामार्गावर रास्ता रोको, पडळकरांवरील चप्पलफेकचे पडसाद

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शनिवारी झालेल्या चप्पलफेकचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले.

road block Khamgaon Jalna highway
बुलढाणा : खामगाव जालना महामार्गावर रास्ता रोको, पडळकरांवरील चप्पलफेकचे पडसाद (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शनिवारी झालेल्या चप्पलफेकचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले. आमदार पडळकरांनी शांततेचे आवाहन केले असतानाही रास्ता रोको करण्यात आला.

हेही वाचा – “…ही तर तरुणांची थट्टाच”, नागपुरातील रोजगार महामेळाव्यावरून नाना पटोले यांची भाजपावर टीका

Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल
Raju Shetty on highway
धार्मिक स्थळे जोडणाऱ्या महामार्गासाठी चौपट नुकसान भरपाई मिळावी; अन्यथा, रक्ताचे पाट वाहतील पण.. – राजू शेट्टी यांचा इशारा
Director General of Police Rashmi Shukla warns Naxalites in Gadchiroli
‘‘नागरिकांच्या सहकार्यानेच नक्षलवाद संपवू,” नक्षल्यांच्या गडातून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा इशारा…
inspection of four vehicles Dhule district
एकापाठोपाठ चार वाहनांच्या धुळे जिल्ह्यात तपासणीचे कारण काय?

हेही वाचा – वाशिम : दोन दाम्पत्यांचे विस्कटलेले संसार नव्याने फुलले; लोक अदालतमध्ये प्रेमाचा समेट…

सिंदखेडराजा येथे खामगाव जालना महामार्गावर आज, रविवारी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. चप्पलफेक करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आजच्या आंदोलनात केवळ धनगर बांधवच नव्हे तर समस्त ओबीसी घटक सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. जरांगे रोज भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला. तेही महाराष्ट्रात फिरत असल्याने त्यांच्यावरही चप्पलफेक होऊ शकते, असेही ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Road block on khamgaon jalna highway anger over shoe throwing on gopichand padalkar scm 61 ssb

First published on: 10-12-2023 at 16:27 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×