वाशीम : पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला की ते नाते तुटण्याच्या दिशेने जाऊ लागते आणि न्यायालयात जाऊन नाते संपुष्टात आणले जाते. मात्र ही नाती संपुष्टात येऊ नयेत म्हणून न्यायालयही शेवटच्या क्षणापर्यंत आटोकाट प्रयत्न करीत असते. लोक अदालतमध्ये असेच विभक्त राहत असलेल्या दोन वैवाहिक वादाच्या प्रकरणांमध्ये निलेश व वनिता आणि सुनील व अनुसया या पती-पत्नी यांच्यात प्रेमाचा समेट घडून आला. त्यांनी आता पुन्हा एकदा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी न्या.‌आर.पी. पांडे यांनी या दाम्पत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या भावी आयुष्याकरीता शुभेच्छाही दिल्या. लोक न्यायालयाव्दारे त्यांचा संसार फुलल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व्ही.ए. टेकवाणी आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा – “आयोगावर दबाव आणण्यापेक्षा जातनिहाय जनगणना घोषित करा”, आमदार यशोमती ठाकूर यांची मागणी; म्हणाल्या…

हेही वाचा – “…ही तर तरुणांची थट्टाच”, नागपुरातील रोजगार महामेळाव्यावरून नाना पटोले यांची भाजपावर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१ हजार १८९ प्रकरणे निकाली

एका दिवसात जिल्ह्यामधील न्यायालयात प्रलंबित असलेल्या १ हजार ६ प्रकरणांचा तसेच दाखल पूर्व १८३ प्रकरणे, असे एकूण १ हजार १८९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व ४ कोटी ६१ लक्ष १० हजार ९१८‌ रक्कमेची प्रकरणे निकाली काढण्यात आली.