मलवाहिनीची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मलवाहिनीच्या ‘मॅनहोल’मध्ये प्रवेश न करता ते सुरक्षितपणे स्वच्छ करता यावे, यासाठी यंत्रमानवांचा वापर केला जाणार आहे. यासाठी नागपूर स्मार्ट सिटीने तीन ‘रोबोट’ भाडेतत्त्वावर घेतले आहेत.

हेही वाचा >>>‘दिवाळी ऑफर’च्या नावावर सायबर गुन्हेगारांकडून लूट! ; कमी किंमत, एकावर एक मोफत योजनेचे आमिष

नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने अत्याधुनिक ‘रोबोट मशीन’ भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. या ‘रोबोट मशीन’मुळे नागपूर शहरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्येवर दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील ‘मॅनहोल्’च्या देखभालीमध्ये अधिक सुरक्षितता आणण्यासाठी हा उपक्रम नागपूर स्मार्ट सिटीत अंर्तभूत आहे.

हेही वाचा >>>नागपूर : बदनामी होऊ नये म्हणून आईचे दागिने केले प्रियकराच्या स्वाधीन

हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प असून, समाधानकारक काम आढळल्यास महानगरपालिका अधिक प्रमाणात ‘रोबोट’ घेण्याचा विचार करेल. हे ‘रोबोट’ ‘जेनोरोबोटिक्स’ कंपनी कडून भाडेतत्त्वावर घेण्यात आले असून, नागपूर स्मार्ट सिटीतर्फे या कंपनीला प्रत्येकी रोबोटच्या मागे सात लाख रुपये भाडे निश्चित केले आहे, असेही नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे म्हणाले.