नागपूर: अजित पवार यांच्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलतांना म्हणाले, अजित पवार यांनी पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेलं विधान चुकीचं आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. याप्रसंगी त्यांनी घातलेल्या जॅकेटवर विशिष्ट मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान केल होत. त्यात पवार म्हणाले, पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात?, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली. त्यावर रोहित पवार म्हणाले, युवकांवर कुणी शंका घेता कामा नये. पीएचडी करणारी मुलं कोण आहेत? तर ही गरिबाची मुलं आहेत. पीएचडीसाठी जो वेळ लागतो. त्यासाठीचा पैसा या मुलांकडे नाही. त्यामुळे ते सरकारकडे येत असतील.

हेही वाचा… सावधान! अमरावतीत डेंग्यूचा प्रकोप! ५४४ रुग्ण आढळले, एकाचा मृत्‍यू

सरकारची मदत घेत असतील. तर त्यात चूक काय? एखादा श्रीमंताचा मुलगा असता तर तो सरकारकडे आला असता का? ज्या मुलांकडे क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे. पण पैसा नाही, म्हणून ही मुलं सरकारच्या स्कॉलरशीपवर शिकत असतील. तर त्यात काहीही चूक नाही. त्यावर कुणी शंका घेऊ नये. अजितदादा जे बोलले त्याचा निषेध मी करतो, असेही रोहित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम शिंदे यांच्यावरही टीका…

राम शिंदे यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. नीरव मोदीने त्यांच्या आमदाराकीच्या काळात जमीनी विकत घेतल्या होत्या. मग त्यांनी पैसे खाल्ले असं म्हणायचं का ? राम शिंदे यांच्यावर टीका करण्यात मला रस नाही. आम्हाला त्यांच्यासारखं भाड्याने माणसे आणावी लागत नाही. युवा वर्ग आमच्यासोबत आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं.