वर्धा : ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मुंबईच्या आझाद मैदानात आता क्रांतीदिनी ९ ऑगस्टला आंदोलनाचा बिगूल वाजणार आहे. एस. टी. मंडळाचे कामगार कास्ट्राइब संघटना बेमुदत उपोषण सुरू करणार.

मंडळाच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले होते. त्याची अद्याप पूर्ती झाली नसल्याची माहिती सुनील नीरभवणे यांनी दिली. २०१६ पासून वेतनवाढ व घरभाडे भत्ते वाढीच्या फरकाची रक्कम थकीत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळाला नाही. भरती, बढती यातील अनुशेष त्वरित भरून काढावा. तसेच अन्य मागण्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धर्मपाल ताकसांडे यांनी जाहीर केले.

हेही वाचा – ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’: युवकांच्या नवीन कल्पनांना उभारी देणारी स्पर्धा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – नागपूर : ‘स्मार्ट सिटी’ की ‘क्राईम सिटी’? दीड महिन्यात १२ हत्याकांड; पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगारांचा हैदोस

आंदोलनाची नोटीस मुख्यमंत्री तसेच मंडळाच्या वरिष्ठांना देण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांतील प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होत आहेत.