लोकसत्ता टीम

बुलढाणा: ‘बेलगाम, गलिच्छ विधाने करणारे मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी अन्यथा माझ्या हातून त्यांचा ‘मर्डर’ होईल. आणि गृहमंत्री म्हणून त्याची जवाबदारी तुमच्यावर राहील…’ हे विधान एखाद्या अपरिपक्व, अशिक्षित युवक वा व्यक्तीचे नाही. तर हा इशारा दिला आहे माजी मंत्री व बुलढाणा अकोला जिल्ह्याच्या माजी पालक मंत्र्यानी.

मेहकरचे दोनवेळा आमदार राहिलेले व विदर्भातील तत्कालीन प्रभावी नेते असलेले सुबोध सावजी यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पाठविलेल्या निवेदन वजा पत्राद्वारे हा खळबळजनक इशारा दिला आहे. तसेच आपल्या विधानाचा ‘व्हिडीओ’ सुद्धा सार्वत्रिक केला आहे.

आणखी वाचा-नागपूर : भिडेंविरुद्ध सीताबर्डी पोलिसात राष्ट्रवादीची तक्रार

या व्हिडिओत सावजी म्हणतात, विदर्भ दौऱ्यात भिडे यांनी महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, राष्ट्रध्वज, स्वातंत्र दिन यासह देवताबद्धल गलिच्छ, आक्षेपार्ह, अवमानास्पद विधाने केली. त्यामुळे त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी. असे न झाल्यास माझ्या हातून त्यांचा ‘मर्डर’ होईल. यासाठी गृहमंत्री फडणवीस जवाबदार राहतील. अर्थात माझ्या या कृत्यास ते जवाबदार राहतील असा तंबी वजा कडक इशारा त्यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचा व्हिडीओ सार्वत्रिक होत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तत्कालीन काँगेसचे मोठे नेते असलेले सावजी हे १९७८ -८० आणि १९८५-९० या काळात मेहकरचे आमदार होते. तसेच १९९१- ९३ दरम्यान महसूल राज्यमंत्री व अकोला व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री होते.