scorecardresearch

नागरिकांना सरकारी आगारातून वाळू; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

सामान्य नागरिकांना सरकारी आगारातून वाळू उपलब्ध होईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

नागरिकांना सरकारी आगारातून वाळू; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा
राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर : वाळूच्या अवैध उत्खननास प्रतिबंधासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येईल. यामुळे सामान्य नागरिकांना सरकारी आगारातून वाळू उपलब्ध होईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी dपपळखुटा रोडवर असलेल्या १३ व १४ व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ बारव, पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक, तालुक्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन याबाबत सदस्य संजय गायकवाड व डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

लोणार तालुक्यात वाळू व मुरुम यांचा मोठय़ा प्रमाणात गैरमार्गाने उपसा होत असतानाही याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. यावर उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी वाळू उत्खननाबाबत १५ जानेवारीपर्यंत नवे धोरण येईल, अशी माहिती दिली. विखे पाटील म्हणाले की, या धोरणामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना चाप बसेल. सामान्य नागरिकांना सरकारी आगारातून वाळू उपलब्ध होईल.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या