वर्धा : मातृत्व ही अमोल देण समजल्या जाते. म्हणून बाळ जन्मास येण्याची आस प्रत्येक विवाहितेस लागून राहलेली असते. त्याचा महिमा म्हणून ८ मार्चला मातृत्व दिन साजरा केल्या जातो. महिलांमध्ये मातृत्व सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा त्यामागे हेतू असतो. पण मूल होत नसेल तर ? तब्बल २३ वर्षापासून अपत्यसुखाला वंचित विवाहितेची ही कथा. मात्र विशेष उपचार केल्यानंतर तिळे जन्मास येण्याचा सुखद अनूभव या विवाहितेला आला आहे.

लग्नाला २३ वर्ष झालेली. मात्र अपत्य नं झाल्याने तीन वेळा विशेष शस्त्रक्रिया पण करण्यात आली. तरीही अपत्यसुखाला मुकलेल्या थायरॉइड आजारग्रस्त ४५ वर्षीय विवाहिता सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयातील शेवटी दाखल झाली. या रुग्णालयातील टेस्ट ट्यूब बेबी केंद्रातील आयव्हिएफ उपचारांनी तिला एकाचवेळी मातृत्वाचा तिहेरी आनंद बहाल केला.

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील मध्यमवर्गीय कुटूंबातील ही विवाहीता आहे. तिला थायरॉइड ग्रंथीद्वारे पुरेशा प्रमाणात थायरॉइड हार्माेन्स निर्माण करू न शकणाऱ्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे गर्भधारणा होत नसल्याने मधल्या काळात तीन वेळा गर्भाशयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र तरीही मातृत्व प्राप्त झााले नव्हते. दरम्यान नातेवाईकांकडून सावंगी रूग्णालयाच्या व्हिट्रो फर्टिलायझेशनची माहिती या दांम्पत्यास प्राप्त झाली. अखेरचा प्रयत्न म्हणून गतवर्षी या जोडप्याने सावंगीत नोंदणी करत उपचार सुरू केले. येथील आयव्हीएफ केंद्राच्या संचालक डॉ. दिप्ती श्रीवास्तव यांनी उपचार सुरू केले आणी त्याला यष प्राप्त झाले. मात्र या प्रक्रियेतून तिहेरी गर्भधारणा झाल्याने आठव्या महिन्यातच प्रसववेदना सुरू झाल्या. उच्च जोखीमेचा अश्या गर्भावस्थेत रूग्णाची नीट काळजी घेत प्रसूती करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेने दोन मुली व एक मुलगा अशा तीन गोंडस बाळांना जन्म दिला. टेस्ट ट्युब बेबी प्रक्रियेतून जन्माला आलेल्या या बाळांचे वजन कमी ठरले. म्हणून त्यांना लगेच नवजात शिशु अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. डॉ. सागर कारोटकर, डॉ. महावीर लाक्रा, डॉ. राशी गुप्ता व चमूने बाळांची काळजी धेटली. अखेर उपचारांना विराम मिळाला. सुरक्षित मातृत्व हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे, या भावनेने हे संगोपन झाले. २३ वर्षानंतर तीन बाळांचे लाभलेले मातृत्व घेऊन ही महिला घरी परतली. तेव्हा कुटुंबाने आनंदात तीचे स्वागत केले. आनंदाचे माप घरात टाकणाऱ्या सावंगी रुग्णालयाचे आभार पण मानले.