चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक आणि शिपाईपदांच्या भरतीवर घोटाळ्याचे सावट आहे. बँकेचे व्यवस्थापन भरतीवरील संशय दूर करण्याऐवजी माहिती लपवत आहे, असा आरोप होत आहे. मुलाखतींच्या आधी परीक्षार्थ्यांचे गुण जाहीर केले नाही. ज्यांना मुलाखतीला बोलावले, त्यांची यादी गुणांसह जाहीर केली नाही, तसेच बँकेतही लावली नाही. दुसरीकडे, मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी बोगस अनुभव, टंकलेखन आणि ‘टॅली’चे प्रमाणपत्र भद्रावती येथे आर्थिक व्यवहारातून दिले गेले, अशीही खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

शिपाई पदांच्या ९७ जागांसाठी २९१ जणांच्या मुलाखती पार पडल्या. आता लिपिकपदांच्या २६१ जागांसाठी ७८३ जणांच्या मुलाखती सुरू आहेत. २३ तारखेला मुलाखती संपल्यानंतर २४ला नियुक्तपत्र मिळण्याची शक्यता आहे. २७ला बँकेवर प्रशासकाची नियुक्ती होईल, असे सांगितले जाते. ऑनलाईन परीक्षा घेणारी कंपनी सर्व विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर टाकते. ‘आयटीआय’ने तसे काहीच केले नाही. परीक्षार्थ्यांच्या ‘लॉगिन आयडी’वर उत्तरपत्रिका पाठवल्या. यातील काही उत्तरपत्रिका बदलून गुण वाढवण्यात आले, असा परीक्षार्थ्यांचा आरोप आहे. आयटीआय कंपनीने परीक्षा घेवून परीक्षार्थ्यांची गुणांसह यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिली. त्यानंतर कंपनीचे काम संपले. सर्व परीक्षार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर टाकण्याची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाची होती. भरतीसंदर्भातील सर्व परिपत्रक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्याच स्वाक्षरीने निघाले. ज्या परीक्षार्थ्यांना मुलाखतींना बोलवण्यात आले, त्यांचेही गुण सार्वजनिक केले नाही. मुलाखतीच ‘कटऑफ’ नेमका किती गुणांवर होता, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. साधारणतः कोणत्याही परीक्षेत परिक्षार्थ्यांचे गुण सार्वजनिक केले जातात, बँकेकडून लपवाछपवी करण्यात आली. त्यामुळे ४० गुण असलेल्या परीक्षार्थ्यांनाही मुलाखतीचे पत्र आले. ६० गुण असलेले परीक्षार्थी मात्र वंचित राहिले, असे काहींचे म्हणणे आहे.

Chhagan Bhujbal claims that Gopinath Munde was thinking of forming separate party
गोपीनाथ मुंडे वेगळा पक्ष काढण्याच्या विचारात होते, छगन भुजबळ यांचा दावा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
appointments for deputy collector, tehsildar and education officer posts stalled candidates warn of protest at azad maidan from February 17
‘एमपीएससी’च्या शेकडो विद्यार्थ्यांचा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा, सरकारच्या या धोरणा विरोधात…
social security schemes are not free gifts jharkhand speaker mahato
उद्योगपतींना पायघड्या घालताना ‘रेवडी’चा विषय नाही
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका

हेही वाचा…मी बीडची मुलगी, पालकमंत्री झाले असते तर आनंदच झाला असता… पंकजा मुंडे म्हणाल्या …

बोगस प्रमाणपत्र

नोकरभरतीचा मुख्य सूत्रधार बँकेचा एक माजी संचालक आहे. त्याने आधी ऑनलाइन परीक्षेत घोळ केला, आता मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी बोगस प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू केले. मुलाखतीचे दहा गुण आहेत. त्यातील प्रत्येकी एक गुण टॅली, टंकलेखन, एमएसआयटी आणि अनुभव प्रमाणपत्रावर ठेवण्यात आले. हे चारही बनावट प्रमाण बनवून देण्याचे काम या संचालकाचे श्याम आणि संजय नावाचे हस्तक करीत आहे. यासाठी पैसे घेतले जात आहे. सर्व संचालक या माजी संचालकासोबत आता ‘व्हॉट्सॲप’द्वारे संपर्क करीत आहे. त्यांच्या भ्रमणध्वनीत तीन रंगाच्या ‘एक्सलशीट’ आहेत. त्यात कुणाचे किती उमेदवार आहे, याची माहिती आहे.

हेही वाचा…राज्यातील वाघांना शिकारीचा धोका…!

उपोषणकर्ते पोतराजे यांची प्रकृती बिघडली

नोकरभरती घोळाविरोधात भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. रविवारी पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना रुग्णालयात दाखल व्हा, असे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी नकार दिला. दरम्यान, राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. नोकरभरती पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. शासनाकडे याबाबत पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Story img Loader