नागपूर : नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा नजिक झालेल्या अपघातात २५ प्रवासी दगावले. त्यात नागपूरच्या सात प्रवाशांचा समावेश आहे. त्यापैकी पाचजणांची ओळख पटली आहे.

ओळख पटलेल्यांमध्ये आयुष गाडगे, कौस्तूभ काळे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, योगेश गवई यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बुकिंग कार्यालयातून पोलीस प्रवाशांची माहिती घेत आहे.

हेही वाचा – Buldhana Accident : “आम्ही बसच्या काचा फोडून कसेबसे बाहेर पडलो आणि…” दोन प्रवाशांनी सांगितला अपघाताचा थरार

गडकरी, फडणवीस यांना दुःख

बस अपघातात दगावलेल्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ही घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत आठजण जखमी झाले असून, त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे त्यांनी शोकसंदेशात नमुद केले आहे