नागपूर : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर विभागात तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने त्या भागात ‘नॉन-इंटरलॉकिंग’ करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या सात रेल्वेगाड्यांना बुधवारी विलंबाने पोहचल्या.
शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस साडेसहा तास, हावडा-सीएसटीएम एक्स्प्रेस सात तास, रायगड- हजरत निझामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस साडेचार तास, शालिमार-ओखा सुपरफास्ट एक्स्प्रेस पाच तास, पुरी-अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस साडेचार तास, हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस चार तास, हावडा-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस सात तास विलंबाने बुधवारी नागपुरात आली.
