गडचिरोली : ओळखीचा गैरफायदा घेत पाच वर्षांपासून एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोघे शिक्षक, तर एक न्यायालयात कारकून आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अक्षय दादाजी रामटेके, पवन दादाजी रामटेके, दोघेही रा.तुळशी, ता.देसाईगंज व भूपेश मोहनलाल कनोजिया रा.देसाईगंज अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अक्षय रामटेके हा गडचिरोली न्यायालयात कारकून असून, पवन रामटेके व भूपेश कनोजिया हे दोघेही शिक्षक आहेत. या तिघांपैकी एका आरोपीच्या मित्राच्या माध्यमातून पीडित मुलाशी ओळख झाली. त्यातून दोघांचे संबंध आले. पुढे त्याने अन्य दोन आरोपींना माहिती दिल्यानंतर तेदेखील त्या मुलाचे लैंगिक शोषण करू लागले.

हेही वाचा – बुलढाणा : राज्यपाल रमेश बैस गजानन महाराज चरणी नतमस्तक; विविध उपक्रमांची घेतली माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपींपैकी एकाचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. त्याच्या वागणुकीवर शंका आल्याने त्याच्या पत्नीने स्वतंत्ररित्या यासंदर्भात चौकशी केली असता वेगळीच माहिती पुढे आली. आपल्या पतीचे एका अल्पवयीन मुलाशी संबंध असल्याचे तिच्या लक्षात आले आणि प्रकरणाचे बिंग फुटले. पीडित मुलाच्या तक्रारीनंतर देसाईगंज पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते.