नागपूर : फेसबुकवरून ओळख झालेल्या युवकाने एसटी विभागात कंडक्टर असलेल्या विवाहित महिलेचे सलग दोन वर्षे लैंगिक शोषण केले. तिच्याकडून पैसे घेऊन परत न करता फसवणूक केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सतीश पुरणलाल फरदे (३७, पँराडाईस हिल, वाघधरा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शैलजा (काल्पनिक नाव) ही एसटी विभागात कंडक्टर आहे. ती विवाहित असून तिला दोन मुले आहेत. पतीशी पटत नसल्यामुळे त्यांचे कौटुंबिक न्यायालयात प्रकरण सुरू आहे. विभक्त राहत असलेल्या शैलजा हिची फेसबुकवर सतीश फरदेसह ओळख झाली. सतीश हा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करीत असून तो विवाहित आहे. त्याला पत्नी व दोन मुले आहेत. दोघांची काही दिवस ‘चॅटिंग’ झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. नोव्हेंबर २०२० मध्ये दोघांची भेट झाली.

हेही वाचा – ‘ही’ पदभरती तात्पुर्ती स्थगित, काय आहेत कारणे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने शैलजाला गणेशपेठमधील बसस्थानकाजवळ असलेल्या एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जवळपास दोन वर्षे सतीशने शैलजाचे लैंगिक शोषण केले. तिच्या वेतनातून दर महिन्याला पैसे घेत होता. लग्नानंतर पैसे परत करण्याचे त्याने आमिष दाखवले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने तिला लग्नास नकार दिला, तसेच पैसेही परत करण्यास नकार दिला. त्यामुळे शैलजा नैराश्यात गेली. तिने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून सतीशला अटक केली.