वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामदास विरुद्ध आघाडीचे अमर काळे यांच्यातील लढत दिवसेंदिवस रंगतदार व चुरशीची होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हवे नको ते राजकारणाचे डाव फेकण्याचा प्रयत्न उभय बाजूने होत आहे. व्यवस्थापन कुशल भाजप तर उत्साहाच्या लाटेवर आघाडी विजय सोपा करण्याचे प्रयत्न करीत आहेत. अमर काळे यांचे मामा असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तळ ठोकून प्रचार कार्याचा आढावा घेतात. हवे ते उपलब्ध करून देतात. पण हे पुरेसे नसून आणखी काही करणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटत असावे.

कारण त्यांनी आता काही भाजप नेत्यांवर जाळे फेकणे सुरु केल्याची माहिती हाती आली आहे. प्रामुख्याने रामदास तडस यांचे पक्षातील विरोधक त्यांचे लक्ष्य असल्याचे आढळून आले. भाजपचे माजी प्रदेश सचिव तसेच पक्षाचे देवळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश बकाने यांना फोन करीत त्यांनी अमर यांस मदत करावी, अशी विनंती केली. बकाने यांनी यांस दुजोरा दिला. त्यांचा फोन आला होता. मदत मिळावी अशी भावना व्यक्त केली. मी त्यांना स्पष्ट सॉरी म्हणत विनंती फेटाळली. राजकारणात असे प्रयत्न होत असतातच.

हेही वाचा…कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !

मलाच नव्हे तर माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांचे फोन गेले. मी कोअर समितीचा सदस्य आहे. त्यामुळे प्रचार धुराच माझ्याकडे आहे. मला असा फोन आल्याचे मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना कळविले आहे, असे बकाने यांनी स्पष्ट केले. तडस यांना पुन्हा उमेदवारी नं देता आम्हास मिळावी, अशी मोर्चेबांधणी भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. पण तडस यांनी सर्वांना धोबीपछाड देत तिकीट खेचून आणली.

हेही वाचा…‘हॅलो… मी उमेदवार बोलतो…’ अनपेक्षित दूरध्वनीमुळे मतदार त्रस्त

आता अशी काही स्पर्धा राहली नसल्याने सर्व एकदिलाने कमळ विजयी होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची खात्री तडस देतात. मात्र दोन अन्य असंतुष्ट भाजप स्पर्धक नेत्यावर मात्र करडी नजर असल्याचे दिसून आले.