नागपूर: रिषभ शेट्टीचा कांतारा हा चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. रिषभ शेट्टीच्या अंगात त्यांची ग्रामीण देवता येते. यातील रिषभचा अभिनय पाहण्यासारखा असतो. नागपूरमध्येही अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये धार्मिक दृश्यांमध्ये धार्मिक विधी, देवतांचे चित्रण आणि आध्यात्मिक कथांचा समावेश असतो, जे अनेकदा चित्रपटांचे मुख्य कथानक बनतात.

काही चित्रपट थेट धार्मिक कथांवर आधारित असतात, तर काही धार्मिक श्रद्धेचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामावर लक्ष केंद्रित करतात. अनेक चित्रपटांमध्ये पूजेसारखे धार्मिक विधी आणि सण यांचे तपशीलवार चित्रण दाखवले जाते. यामुळे प्रेक्षकांना त्या धार्मिक कार्यांचे गांभीर्य आणि पवित्रता समजते. कांतारा चित्रपटातून हे सिद्धही झाले आहे.

नागपूरमध्ये काही भागात शारदा उत्सव सुरू आहे. कळमना पोलीस स्टेशन परिसरातील शारदा देवीच्या विसरजनाची मिरवणूक निघाली असता चक्क एका महिलेच्या अंगात शारदा देवी आली. तिचा पुढे आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. तसेच कांतारासारख्या चित्रपटातील एखाद्या कलाकारालाही लाजवेल असा त्या महिलेचा व्हिडीओ आहे.

शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो. प्रथम चैत्र महिन्यात (ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. नऊ दिवसाच्या जागरण आणि उत्सवानंतर देवीचे विधीवत विसर्जन केले जाते.

नेमका काय प्रकार घडला?

नागपूरच्या कळमना परिसरात शारदा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवानंतर विसरजनाची मिरवणूक काढण्यात आली. कळमना पोलीस स्टेशनच्या परिसरानजीक ही मिरवणूक येताच एक अनोखा प्रकार घडला. एका महिलेल्या अंगात चक्क शारदा देवी आल्याचे सांगण्यात आले. व्हिडीओमधील ही महिला अंगात देवी आली असे भासवून जीभ बाहेर काढून नाचत असल्याचे दिसून येते. देवीच्या मागेमागे ही महिलाही नाचत चालताना दिसते. या प्रकारामुळे परिसरात अंगात देवी आल्याची एकच चर्चा सर्वत्र होती. आणि हा व्हिडीओही सर्वत्र व्हायरल झाला आहे.