बुलढाणा: बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या कृतीवरून राजकीय वादळे उठते, त्यांच्या वादंग निर्माण होते. आमदार गायकवाड आणि वाद-वादंग-वादळ असे समीकरणच मागील दोन वर्षांपासून तयार झाले आहे. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण ते वेगळ्या आणि  तितक्याच गंभीर कारणाने. गुरुवारी वादंगाचे  मूळ ठरले त्यांचे शाही वाहन आणि सुरक्षा रक्षक पोलीस.

आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी,त्यांचे वाहन स्वच्छ करीत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. माजी आमदार, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंट वरून तो व्हिडीओ पोस्ट केला. एवढंच नव्हे तर त्यावर ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा सवाल केला आहे…

हेही वाचा >>>भंडारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नाकारली

बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यासह शिंदेच्या ४० आमदारांना व खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ती सुरक्षा अद्यापही कायम आहे. दरम्यान आ।दार गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस त्यांचे वाहन धुत असल्याचा एक व्हिडिओ अज्ञात प्रेमीने शूट केला. पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केला आहे. हा पोलीस कर्मचारी नेमका कोण हे व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही, मात्र आमदार गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकीच तो एक असावा असा अंदाज आहे. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद असलेली महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आया बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की,आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी ? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान पोलीस विभागाचा ‘गौरव वाढविणाऱ्या’  पोलीस कर्मचाऱ्याच्या या वर्तनावर पोलीस अधीक्षक सुनील कडासने काय कारवाई करणार? करणार की नाही?  असा सवाल या निमित्त याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी विचारणा केली असता, चौकशी करून कारवाई करू असे सरधोपट शासकीय उत्तर त्यांनी लगावले.

हेही वाचा >>>वर्धा : मालदीवच्या समुद्रकिनारी फुलणार या खेड्यातील रोपटी, देशविदेशात मागणी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे टीकास्त्र; व्हिडीओ केला गृहामंत्र्यांना टॅग

दरम्यान आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुत असतानाचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ २९ ऑगस्ट रोजी वेगाने व्हायरल झाला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणावर घणाघाती टीका केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची काय दुर्दशा करून ठेवली? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंबादास दानवे यांनीदेखील तो व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्राम वर अपलोड केला आहे. “पोलिसांवर कुत्र्यासारखा धावून जाणारा नपुंसक काल बघितलाच आपण, महाराष्ट्रातले गृहमंत्री एवढे निष्क्रिय की आता पोलिसांना सत्ताधारी आमदारांची गाडी पण धुवून द्यायची वेळ आली.फडणवीसांनी पोलिसांची काय दुर्दशा करून ठेवली असा सवाल  विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला. ही पोस्ट (त्यांनी) दानवे यांनी फडणवीस यांना टॅग केली आहे .