नागपूर : कॉंग्रेस क्षनेते माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापासून दूर करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी शिवराज मोरे यांना प्रदेशाध्यपदाची धुरा देण्यात आली आहे. कुणाल राऊत यांनी काही वादग्रस्त निर्णय घेतले होते. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली होती.

राऊत यांनी युवक काँग्रेस कार्यकारिणीतील तब्बल ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले होते. त्याविरोधात पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ दाद मागितली होती. त्यानंतर तो आदेश मागे घेण्यात आला होता. या घडामोडीनंतर युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करून कुणाल राऊत यांच्या इशारा देण्यात आला होता.

पक्ष संघटनेचे नियम डावलून एकाधिकारशाहीने काम करणाऱ्या युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यासह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांना काँग्रेसच्या वरिष्ठ तसेच भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी झटका देत उपाध्यक्ष असलेले शिवराज मोरे यांची प्रदेश संघटनेच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती केली होती. आता त्यांना थेट प्रदेशाध्यक्ष करून कुणाल राऊत यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अलिकडे कुणाल राऊत यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात होते. तेव्हाच त्यांना पद जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. आज विश्वजीत मोरे यांच्या नियुक्ती आदेश काढण्यात आले आहे.

दरम्यान, कुणाल राऊत पक्षशिस्त न पाळता संघटना चालवत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी देखील दिल्लीत पोहचल्या होत्या. अध्यक्ष म्हणून कुठलीही जबाबदारी पार न पाडता सक्रिय पदाधिकाऱ्यांना सूडबुद्धीने पदमुक्त करणाऱ्या राऊतांनाच पक्षाने कार्य अहवाल सादर करायला सांगितल्याचे ऐकिवात आहे. उपाध्यक्ष तन्वीर विद्रोही, सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे,अनुराग भोयर, मिथिलेश कन्हेरे,अक्षय हेटे, अभिषेक धवड यांच्यासारख्या पदमुक्त केलेल्या सर्व ६० पदाधिकाऱ्यांची दखल घेत मोठी चपराक अध्यक्ष कुणाल राऊत यांना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब व राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशताना कुणाल राऊत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरवरील प्रतिमेला काळे फासल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. मात्र सर्व पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करीत असे कृत करणार्‍यावर कारवाईची मागणी केली. ३ फेब्रुवारी २०२५ ला कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषदेत येऊन या छायाचित्राला काळे फासले. तसेच मोदींऐवजी भारत अशी अक्षरे चिपकवली. व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे असे म्हणत काळे फासले होते.