गोंदिया : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री बनवण्याचा मानस बोलून दाखवला आहे. याबाबत रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी महिलांबाबत घेतलेला निर्णय क्रांतिकारक आहे. मात्र, मी त्या स्पर्धेमध्ये नाही. कारण शिवसेना या परिवारातील मी शेंडेफळ आहे. माझ्यापेक्षाही ज्येष्ठ मंडळी पक्षात आहेत. असे वक्तव्य करणे म्हणजे केवळ कंड्या पिकवण्याचे काम असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाप्रबोधन यात्रेसाठी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे शुक्रवारी गोंदियात आगमन झाले. यावेळी त्या माध्यमांसोबत संवाद साधत होत्या. महाप्रबोधन यात्रेनिमित्त दोन दिवस त्या विदर्भात असणार आहेत. शुक्रवारी पूर्व विदर्भातील गोंदिया तर शनिवारी भंडारा येथे त्यांच्या सभा होणार आहेत. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव, अल्पसंख्यक सेनेचे जिल्हा अध्यक्ष जाबिर शेख उपस्थित होते.

हेही वाचा: मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका! ; कर्नाटकचे महाराष्ट्राला पत्र; चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई दौऱ्यावर ठाम

प्रकाश महाजनांच्या टीकेचा खरपूस समाचार

उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारेंना भुंकायला ठेवले आहे, अशी टीका मनसेचे वयोवृद्ध नेते प्रकाश महाजन यांनी केली होती. त्याविषयी सुषमा अंधारे म्हणाल्या, प्रकाश महाजन आपल्या पक्षाचे संस्कार दाखवतात. पातळी सोडून बोलणे याची शिकवण त्यांना असावी. तरीही मी त्यांचे आभार मानेन. कारण त्यांच्या पक्षनेतृत्वाच्या संस्कारांचा परिचय ते महाराष्ट्रातील जनतेला करवून देत आहेत, अशा शब्दांत त्यांच्या टीकेचा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader sushma andhare said in gondia she not the race for the post of chief minister tmb 01
First published on: 03-12-2022 at 10:20 IST