शिवसेनेचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोटे व तथ्यहीन आरोप केले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी तक्रार शिवसेनेच्यावतीने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली आहे.

हेही वाचा- नभांगणातील ‘त्या’ दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्याची पुन्हा संधी

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ‘डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. खासदार राऊत यांनी त्यांच्यावर जीवे मारण्याचा खोटा व तथ्यहीन आरोप केला. त्याला कोणताही आधार नाही. या आरोपामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांची छवी मलिन झाली आहे.खा. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.’

हेही वाचा- सावधान! नागपूरमध्ये अद्याप लहान मुलांमध्येच गोवरचे संक्रमण; प्रौढांनी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तक्रार दाखल करण्यापूर्वी सिव्हिललाइन चौकात खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले व त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी कारवाईची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील, अश्विन नवले, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मानकर, निखिल ठाकूर, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, महेश मोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.