नागपूर : कन्हान हद्दीत येणाऱ्या कांद्री गावात वेकोलिच्या स्फोटाच्या धक्क्याने एक झोपडी कोसळली. या झोपडीत राहणाऱ्या बापलेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. कमलेश गजानन पोटेकर (३४) आणि याजवी पोटेकर (५) अशी मृत बापलेकीची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कांद्री गावाशेजारी वेकोलिच्यावतीने खाणीत मोठ्या दाबाचे स्फोट करणे सुरू आहे. स्फोटामुळे गावातील अनेक घरांना हादरा बसतो. याबाबत गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य वाडीभस्मे यांच्या माध्यमातून वेकोलिशी पत्रव्यवहार केला आहे. त्यात मोठ्या दाबाचा स्फोट करू नये, अन्यथा गावातील घरे कोसळण्याची शक्यता आहे, असा उल्लेख करण्यात आला होता.

हेही वाचा – नागपूर-वर्धा तिसरा रेल्वे मार्ग : खापरी पूल तोडण्याचे काम सुरू

हेही वाचा – धक्कादायक! हुडकेश्वरच्या हवालदाराकडे चक्क आरोपीची कार, जप्तीच्या मुद्देमालाचा पोलिसांकडूनच वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमलेश पोटेकर यांचे केशकर्तनालयाचे दुकान आहे. सोमवारी दुपारी ते मुलगी याजवीसह घरात विश्रांती घेत होते. दरम्यान, वेकोलि खाणीत मोठा जोरदार स्फोट करण्यात आला. त्यामुळे झोपडी कोसळली. कमलेश आणि मुलगी याजवीच्या अंगावर लाकूड आणि दगड पडले. यामध्ये दोघेही ढिगाऱ्याखाली दबले. शेजाऱ्यांनी मदतीसाठी धावपळ केली. मात्र, दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.