वाशिम : जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांच्यासह १० नगरसेवक व सहकारी कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार पक्षात प्रवेश केला. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

मागील १८ महिन्यांपूर्वी मानोरा नगर पंचायतची निवडणूक पार पडली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १४ नगरसेवक निवडणुकीत विजयी झाले होते. नगर पंचायतवर एकहाती सत्ता काबीज करूनही विकास कामांकरिता शासकीय निधी मंजूर होत नसल्याने नगराध्यक्ष ठाकरे, त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रेखा ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ नगरसेवक व भाजपा नगरसेवक यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – अकोला : काकाचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

हेही वाचा – हेल्मेट वापरा, अन्यथा कारवाईला सामोरे जा! गोंदिया जिल्ह्यात ५० दिवसांत ५ हजार दुचाकी चालकांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा नगरसेवकही प्रहारमध्ये

भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविलेले आणि निवडून आलेले एकमेव नगर पंचायत सदस्य अभिषेक चव्हाण यांनीदेखील नगराध्यक्ष ठाकरे यांच्यासोबत प्रहारमध्ये प्रवेश केला.