लोकसत्ता टीम

नागपूर: एका नराधम युवकाने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७७ वर्षीय वृद्धेच्या असाहय्यतेचा फायदा घेऊन बलात्कार केला. हे घाणरडे कृत्य करीत असताना औषध घेऊन आलेल्या परीचारिकेला हा प्रकार दिसल्यामुळे ही घटना उघडकीस आली. समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेनंतर धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकास अटक केली. दीपक विजय ठाकरे (वय ३९,रा. माटे चौक, गोपालनगर) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला शासकीय सेवेतून अधिकारी पदावरून निवृत्त झाली आहे. तिला मूलबाळ नसल्याने तिने नातेवाईक मुलाला दत्तक घेतले. तोच वृद्धेची काळजी घेतो. तीन दिवसांपूर्वी वृद्धेला लकवा झाला. तिला धंतोलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी दीपक हा मित्राला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला. मुलाने दीपकला आईजवळ रुग्णालयात ठेवले आणि घरून डब्बा घेऊन येत असल्याचे सांगितले.

आणखी वाचा- वाशीम शहरात ‘बर्निंग कार’चा थरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकृत मानसिकतेच्या दीपकने रुग्ण असलेल्या वृद्धेवर बलात्कार केला. याचदरम्यान एक परीचारिका औषध घेऊन तेथे आली. तिने हा सर्व प्रकार बघताच आरडाओरड केली. डॉक्टर आणि अन्य परिचारिका धावतच आल्या. त्यांनी दीपकला चांगली चोप दिला आणि धंतोली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.