चंद्रपूर: केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय देत शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांचे असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाविरूध्द सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या निर्णयाचे पडसाद चंद्रपूरातही उमटले असून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत राज्य सरकारचा निषेध नोंदविला. येणाऱ्या निवडणूकीत खोके सरकारला जागा दाखवू असा इशाराही ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांचा ‘मोगॅम्बो’ असा उल्लेख; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “राजकारणात…”

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात असंतोष व नाराजीचे वातावरण आहे. नाराज झालेल्या चंद्रपूरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी १९ फेब्रुवारीला संदिप गिऱ्हे यांच्य नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी फडणवीस-शिंदे सरकार राज्यात हुकूमशाही पध्दतीने वागत असून यंत्रणांना हाताशी धरून आपल्या मर्जीतील निर्णय घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत सरकारला जागा दाखवू असे संदिप गिऱ्हे म्हणाले. यावेळी खोके सरकारविरूध्द जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला आहे. आंदोलनात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, महिला संघटिका उज्वला नलगे, निलेश बेलखडे, युवासेना प्रमुख विक्रांत सहारे, स्वप्नील काशीकर, शहरप्रमुख सुरेश पचारे, रोहिणी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.