scorecardresearch

ट्रक-पीकअपचा भीषण अपघात, सहा ठार; मध्‍य प्रदेशातील देडतलाईजवळची घटना

मध्‍य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्‍ह्यातील देडतलाईजवळ ट्रक आणि पीकअप वाहनाच्‍या धडकेत सहा जणांचा मृत्‍यू झाला तर ८ जण जखमी झाले.

truck accident
ट्रक-पीकअपचा भीषण अपघात, सहा ठार

अमरावती: मध्‍य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्‍ह्यातील देडतलाईजवळ ट्रक आणि पीकअप वाहनाच्‍या धडकेत सहा जणांचा मृत्‍यू झाला तर ८ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी धारणी ते खंडवा मार्गावर घडला. अपघातस्‍थळ हे धारणीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. जखमींना खंडवा येथील जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात पीकअप वाहनाचा चक्‍काचूर झाला.

हेही वाचा >>>केसीआर यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, ‘बीआरएस’ गडचिरोलीतून लढणार विधानसभा; माजी आमदार लागले गळाला

धारणी ते खंडवा महामार्गावरील देडतलाई गावाजवळ अकोला जिल्‍ह्यातील अकोट येथून खंडव्‍याकडे जाणाऱ्या पीकअप वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या धडकेने पीकअप वाहनातील मजूर खाली पडले. अपघातात दोन्‍ही वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. लोकांनी बरेच प्रयत्न करून जखमींना बाहेर काढले व खंडवा जिल्हा रुग्णालयात पाठवले. सर्व मृत आणि जखमी हे खंडवा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्‍त ट्रकमधून ऊस वाहून नेला जात होता, अशी माहिती मिळाली आहे. मृतांची नावे कळू शकली नाहीत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 18:19 IST
ताज्या बातम्या