नागपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात अडकलेले अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यांच्या जामीन अर्जावर न्या. मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकल्यानंतर  तात्पुरता सशर्त जामीन मंजूर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेड्डी  यांना काही दिवसांपूर्वी नागपुरातून अटक करण्यात आली. सत्र न्यायालयाने त्यांना नियमित जामीनही नाकारला.  त्यानंतर त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज न्या. पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अर्जदाराची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने रेड्डी यांचा गुन्ह््यात थेट सहभाग नसल्यामुळे तात्पुरता जामीन देण्यास हरकत नाही, असे मत नोंदवून सशर्त जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने रेड्डी यांना आपले पारपत्र पोलिसांत जमा करावे, नागपूर सोडून जाऊ नये, दर सोमवारी निवास परिसरातील सदर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी या अटींवर व ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन मंजूर केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srinivasa reddy granted interim bail akp
First published on: 12-05-2021 at 00:01 IST