खासदार संजय राऊत यांनी २०२४ च्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाची अवस्था ही ‘बेडका’प्रमाणे होईल, अशी टीका केली होती. यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना जोरदार टोला लगावला. संजय राऊत यांच्या मते ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ होतो. ते म्हणतात, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा. मग तुम्ही आपल्या मुलाला डॉक्टर करणार की कंपाऊंडर? अशांना गांभीर्याने घेऊ नका. महाराष्ट्र चालवणे काही ‘हास्य जत्रा’ नाही आणि त्यातही सात अजूबे इस दुनिया में… संजय राऊत हे जगातील आठवे अजूबे आहेत, असा मिष्किल टीका वनमंत्री मुनगंटीवार यांनी केली.

हेही वाचा- ऐकलं का? गोंदियाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवे पाहुणे येणार; वाचा कोण ते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. भाजपा हा सडक्या विचाराचा पक्ष आहे, असे पटोले म्हणतात. पण, भाजपा हा सडक्या नाही तर मूल्यवान विचाराचा पक्ष आहे. पटोले यांनी आपल्या काँग्रेस पक्षाबद्दल बोलावे त्यांनी भाजपाला सडक्या विचाराचा पक्ष म्हणून दाखवून दिले की त्यांचा मेंदू कोणत्या विचाराचा आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीची चौकशी व्हावी, अशी मागणी सभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, जीव कुणाचाही असो महत्त्वाचाच आहे. मोठ्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून नाही तर सर्वसामन्यांच्याही वाहनावर किंवा त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.