बुलढाणा : सावकाराचा जाच असह्य झाल्याने विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने मेहकर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मेहकर न्यायालय मागील भागात राहणाऱ्या शबाना बी फिरोज शेख ( ३७ वर्षे) या महिलेने प्लॉटचे पैसे देण्यासाठी मेहकर येथीलच अवैध सावकार शबाना शेख रशीद शेख (जानेफळ वेस ), साधना गजानन नटाळ (माळीपेठ), बाबा खान जफर खान (बागवानपुरा), रोहन शिंदे (रामनगर) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शबाना बी हिला परत फेड करण्यात विलंब व्हायचा. त्यामुळे अवैध सावकार कधी फोनवर तर कधी घरी येऊन धमकावत होते. यामुळे होणारी बदनामी व मानसिक त्रासाने कंटाळून त्रस्त महिलेने अखेर १८ अक्टोबर रोजी रात्री ८ वाजता गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने पाहिल्याने महिलेला उपचारासाठी मेहकर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले.

हेही वाचा – नागपूर : १३५ कलाकार १२ तास शास्त्रीय नृत्यातून करणार अखंड घुंगरू नाद

हेही वाचा – वाशिम : विमुक्त जाती प्रवर्गातील बेकायदेशीर घुसखोरी थांबवा; पोहरादेवी येथे अन्न व जलत्याग आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपचारादरम्यान २७ अक्टोबर रोजी शबानाचा मृत्यू झाला. महिलेचा पती शेख फिरोज यांनी मेहकर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. मेहकर पोलिसांनी २८ तारखेला रात्री चार अवैध सावकार विरुद्ध ३०६,५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कड करीत आहेत.