नागपूर : तेव्हा फोन नव्हते. आम्ही पत्र लिहायचो. कधीतरी ‘ट्रंक कॉल’ करायचो. ती एक वेगळीच मजा होती. त्या पत्रातली काहीच पत्रे माझ्याकडे आहेत. तिच्याकडे मात्र सगळीच आहेत. मला असे मधाळ पत्र लिहिणारी तरुणी मला दिल्लीत भेटली होती. आज ती माझी पत्नी आहे, अशा शब्दात भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्हॅलेंटाईन विकमध्ये ‘मन की बात’ सांगितली.

यशाच्या उत्तुंग शिखरावर पाेहोचणारी माणसे जाहीरपणे त्याचे श्रेय सहजासहजी कुणाला देत नाहीत. मोजकी माणसे मात्र हे मान्य करण्याचे धाडस दाखवतात. ‘लिटील मास्टर’ अशी ओळख असणारे भारताचे क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी अगदी सहजपणे वेस्टइंडिजचा क्रिकेटपटू गॅरी सोबर्सला स्वत:च्या आयुष्याचा शिल्पकार असल्याचेही सांगितले.

हेही वाचा – “लेट मी टच यू..”, सुनील गावसकर यांनी सांगितला अवाक करणारा किस्सा

सप्तक नागपूर आणि छाया दीक्षित वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टेट ड्राइव्ह’ क्रिकेटचे अफलातून किस्से हा कार्यक्रम शनिवारी पर्सिस्टंट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी किस्स्यांची सुरुवातच सुनील गावसकरांना प्रश्नाची गुगली टाकून केली. कपडे बदलण्याच्या खोलीतून आम्ही क्रिकेट पाहायचो. गॅरी सोबर्स यांच्या खेळण्याची शैली आणि त्यांच्या खेळामुळे जो सकारात्मक परिणाम माझ्यावर झाला, त्यासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहील. मुंबई क्रिकेटशी असलेले नाते अतिशय वेगळे होते. खेळाचे गांभीर्य जे शिकवले ते मुंबई क्रिकेटने आणि खेळाचे संस्कारदेखील तेथूनच झाले. आताच्या आणि भावी खेळाडूंनीदेखील क्रिकेट गांभीर्यानेच खेळले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

हेही वाचा – शालेय विद्यार्थ्यांनंतर आता नागपूर मेट्रोची पदवीधर, पदविकाधारकांसाठी सवलत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक नामवंत लोक आम्हाला भेटतात, पण आम्हा क्रिकेटपटूंचे नशीब ज्यांच्यामुळे घडते, जे आमच्यावर नि:स्वार्थ प्रेम करतात, त्यांना आम्ही भेटू शकत नाही. क्रिकेटमधून सेवानिवृत्त होऊनही त्यांचे प्रेम अबाधित आहे आणि ते पैशाने विकत घेता येणारे नाही, असेही गावस्कर म्हणाले.