नागपूर : मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बंद असतानाच आता येथील उद्वाहन यंत्रही बंद पडले. त्यामुळे दाखल रुग्णांनी वेगवेगळ्या भागात जिन्याने जायचे काय? असा सवाल नातेवाईक विचारात आहे.

हेही वाचा – कर्नाटक पराभवानंतर महाराष्ट्रात भाजपला आत्मचिंतनाची गरज नाही – चंद्रशेखर बावनकुळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. हे यंत्र दुरुस्त झाले नसतानाच सोमवारी सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील दोन्ही उद्वाहन बंद पडले. त्यामुळे दोन ते चार माळ्यावरील वेगवेगळ्या विभागात दाखल रुग्णांना विविध तपासणी वा कामासाठी इतरत्र हलवताना उद्वाहन बंद असल्याने रॅम्प वा जिन्यावरून जाण्याची वेळ आली. त्यामुळे वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. एका डॉक्टरने नाव न टाकण्याच्या अटीवर प्रशासनाने तातडीने संबंधितांना उद्ववाहन दुरुस्तीची सूचना केली. त्यामुळे काही वेळातच ती दुरुस्त झाल्याचा दावा केला.