गोंदिया : १९ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्याने जिलाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या समक्षक आत्मसमपर्ण केले. देवरी दलम कमांडर लच्छु ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी (३९) व देवरी दलम सदस्य कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसाय हलामी (३६) यांनी २३ सप्टेंबर रोजी माओवाद्यांच्या विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आत्मसमर्पण केले आहे.

आत्मसमर्पित नक्षलवादी लच्छूवर एकूण १६ लाखांचे आणि कमलावर ३ लाख रुपयांचे बक्षीस आहे. लच्छू कुमेटी हा १९९९ मद्ये माओवादी संघटनेत दाखल झाला. त्यांनतर त्याने अबुझमाडमध्ये प्रशिक्षण घेऊन स्पेशल झोनल कमेटी मेंबर शेखर ऊर्फ सायण्णा याचे अंगरक्षक म्हणून काम केले. तसेच केशकाल दलम, कोंडगाव दलम छत्तीसगड कोरची, खोब्रामेंढा (गडचिरोली) तसेच गोंदिया येथील देवरी दलम (महाराष्ट्र) मध्ये उपकमांडर या पदावर काम केले आहे. त्याने नक्षल दलममध्ये केलेले काम पाहून त्यास देवरी दलमचे कमांडरपद देण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध गोंदिया जिल्ह्यात चकमकीचे व जाळपोळीचे एकूण ६ गुन्हे नोंद आहेत.

हेही वाचा – चंद्रपूर : कुस्तीपटूचा नदीत बुडून मृत्यू, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती निवड

हेही वाचा – वाशिम : कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या ‘तारांगण’ला उद्घाटनापूर्वीच आग, चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवरी दल सदस्य कमला हलामी ही २००१ मध्ये खोब्रामेंढा दलममध्ये दाखल झाली असून त्यानंतर तिला उत्तर बस्तर व बालाघाटच्या जंगलात प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने दलम सदस्य म्हणून कोरची, खोब्रामेंढा, चारभट्टी दलम, प्लाटून- ए (गडचिरोली), गोंदिया येथील देवरी दलममध्ये काम केले आहे. तिच्याविरुद्ध गोंदिया जिल्ह्यात मारहाण, पोलीस चमूवर गोळीबार, जाळपोळ, असे एकूण आठ गुन्हे नोंद आहेत.