चंद्रपूर : राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीगीर साहिल प्रविण घुमे (१४, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड) याचा इरई नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

साहिल घुमे हा विठ्ठल मंदिर व्यायामशाळेचा कुस्तीपटू होता. मंगळवारी सायंकाळी त्याची व्यायामशाळेत कुस्ती स्पर्धा होती. कुस्ती स्पर्धेला जाण्यापूर्वी साहिल हा आपल्या दोन मित्रांसह शहरालगत असलेल्या इरई नदीत पोहायला गेला. इरई नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब त्यांच्या दोन मित्रांना समजताच त्यांनी शहरात धाव घेत माहिती दिली. शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – गोंदिया : दोघांचा मृत्यू! एक नदीत बुडाला, दुसऱ्याने तलावात उडी घेतली…

हेही वाचा – वर्धा: आदिवासी आश्रमशाळेत मुलींचा विनयभंग?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पानबुड्यांच्या मदतीने पाहणी केली असता काही अंतरावर साहिलचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा व परिसरावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, साहिलची नुकतीच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामुळे कुटुंब व व्यायाम शाळेत आनंदाचे वातावरण होते. मात्र, स्पर्धेला जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.