नागपूर : शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण, शिक्षणावर होणारा प्रत्येक कुटुंबाचा खर्च, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती, याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पला यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय नमुने सर्वेक्षणाच्या ८० व्या फेरीचे मुख्य लक्ष हे कुटुंबाने शिक्षणावर केलेल्या खर्चावर आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांच्या गळतीचीही माहिती संकलित केली जणार आहे. यानंतरचे सर्वेक्षण हे घरगुती पर्यटन संबंधित राहणार असल्याचे उप्पला यांनी सांगितले. सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन मंगळवारी झाले.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत देशव्यापी नमुना सर्वेक्षणांद्वारे विविध सामाजिक,आर्थिक निर्देशकांवर आधारित माहिती गोळा केली जाते. त्या आधारावर केंद्र आणि राज्य सरकार योजनांचे नियोजन करते.