वाशिम : सध्या वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहेत. शेती व सिंचनाशी निगडीत कार्यालय इतर जिल्ह्यात पळविली जात आहेत. लाखो रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, पालकमंत्री संजय राठोड यांना जिल्हा नियोजन समितीची सभा घ्यायला वेळ नसून त्यांना फक्त टक्केवारीत रस आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा टप्पा दोन निमित्त शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अंधारे जाहीर सभेत बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कुणाचेही नाव न घेता एक फोटो ट्वीट केला की लगेच भाजपाच्या नेत्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हातातील काचेचा ग्लास असलेला फोटो ट्वीट करून तो कोणता ब्रँड आहे असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी थेट जाहीर सभेत मोदींचा फोटो दाखवून तो मोदी ब्रँड असल्याचा टोला भाजपा नेत्यांना लागवला. यावेळी त्यांनी भाजप व शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका केली.

हेही वाचा – वाशिममध्ये २ लाख ५ हजार ६४२ कुणबी नोंदी आढळल्या; संख्या वाढण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – ‘पनोती’ शब्दाचा संबंध मोदींशी का जोडता? पटोलेंचा भाजपाला सवाल, म्हणाले..

या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. यावेळी माजी मंत्री संजय देशमुख, जिल्हा प्रमुख सुधीर कवर, समन्वयक सुरेश मापारी, गजानन देशमुख, माणिकराव देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.