संजय मोहिते

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या शुक्रवारी (दि.२८) होऊ घातलेल्या मतदानासाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये तांत्रिक घोळ असल्याचे चित्र आहे. यामुळे सहकार प्रशासन व बाजार समिती वर्तुळात निर्माण झालेल्या व्यापक संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

मतदान तोंडावर आले असताना पुणेस्थित प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केले आहे. अठरा सदस्यीय बाजार समित्यांमध्ये चार मतदार संघाचा समावेश आहे. सहकारी संस्था मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी-अडते मधून २ तर हमाल-तोलारी मतदारसंघातून एक सदस्य (संचालक) निवडला जाणार आहे. प्रत्येक मतदारास संबंधित मतदारसंघाच्या सदस्य संख्येईतकी मते देण्याचा अधिकार आहे.

हेही वाचा >>>काय सांगता…? काँग्रेस-भाजप युती, तिही निवडणुकीसाठी! वाचा कुठे घडला हा प्रकार…

या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय मतदार याद्या तयार करताना यंत्रणांकडून तांत्रिक घोळ करण्यात आले आहे. ही तांत्रिक चूक असली तरी या याद्या अंतिम असल्याने याद्यांचा हा अधिकृत घोळ आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरणार नाही. याचे प्रमाण बरेच आहे. यामुळे सहकार यंत्रणा व बाजार समिती क्षेत्रातून प्राधिकरणाकडे मोठ्या संख्येने विचारणा करण्यात आली. मतदाराचे नाव एकाच यादीत दोनदा वा एकापेक्षा जास्त मतदारसंघाच्या मतदार यादीत असेल तर मतदानासाठी काय निर्णय घ्यावा? यावर राज्यातून मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राधिकरण म्हणते…

यासंदर्भात प्राधिकरणाने मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार एकाच मतदारसंघाच्या यादीत मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त वेळ असले तरी मतदारास एकाच वेळी मतदान करता येणार आहे. तसेच मतदाराचे नाव एका पेक्षा जास्त मतदारसंघाच्या यादीत असले तरी त्याला एकाच मतदारसंघात मतदान करता येणार आहे.