नागपूर: नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी तात्पुर्ती कंत्राटी स्वरुपाची पदभरती केली जाते. यंदा ७ डिसेंबरपासून अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. अधिवेशन कालावधीकरिता लिपिक – टंकलेखक (१० पदे) शिपाई, संदेशवाहक (२२ पदे) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

शिपाई, संदेशवाहक पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तसेच लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विधानभवन नागपूर येथे सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार) यांनी केले आहे.

हेही वाचा – मिलिटरी कॅन्टीन पुलगावला नाही तर अमरावतीलाच

हेही वाचा – नागपूर: महाराष्ट्र एक्सप्रेसमधून चांदी तस्करी, दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिवेशनानिमित्त विधानभवन इमारत देखभाल दुरुस्तीची कामे काढली जातात. रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर दुरुस्ती दरवर्षी केली जाते. यावर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. यंदाही या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.