लोकसत्ता टीम

बुलढाणा: केंद्र सरकार असो वा राज्यातील पळवापळवी करून बनविलेले राज्यातील सरकार असो, ते केवळ जाहिरातबाजी करण्यातच पुढे आहे. या सरकारसह गद्दारांना महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना(उबाठा) चे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी येथे केले.

बुलढाणा बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदा बढ़े, जिजा राठोड, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्यासह सैनिकांची भरगच्च उपस्थिती होती. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा भांडाफोड केला.

आणखी वाचा-भाजप पक्षश्रेष्ठींनी छाटले डॉ. परिणय फुकेंचे पंख?

ते म्हणाले, महाराष्ट्राची भूमी ही फितुरांना कधीही साथ देत नाही, हा इतिहास आहे. येत्या काळातही विजय हा निष्ठावंतांचाच होईल. निवडून आलेले गेले पण निवडून देणारे मात्र जागेवर आहेत. शिवसेना आणि ठाकरे हे नातं कधीही पुसल्या जाऊ शकत नाही. शिवसेना फोडली तेव्हा लोकांना चीड आली. अलीकडे राष्ट्रवादी फोडली तेव्हा सामान्य माणसांचा उद्वेग वाढला. सत्ता ही शिवसेनेची कधीही गरज नव्हती पण शिवसेना ही महाराष्ट्राची नक्कीच गरज आहे. संकटकाळी शिवसेना धावून येते. भाजप केवळ जाहिरात करण्यात पुढे आहे. काम कमी करायचे आणि हजारोची जाहिरात करायची. त्यामुळे त्यांच्या बोल घेवडया योजनांचा भांडाफोड करण्याचं काम प्रत्येक शिवसैनिक करत असल्याचे बानगुडे पाटील म्हणाले.

आणखी वाचा-ठकसेन जेरबंद ! फिर्यादी चंद्रपूरचा, आरोपी उमरेडचा तर कामगिरी वर्धा पोलिसांची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी बुलढाणा विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र रावराणे (मुंबई), सदानंद माळी, सुनील घाटे, अशोक इंगळे, लखन गाडेकर, अनंता दिवाने, हेमंत खेडेकर, अरुण पोफळे, शुभम घोंगटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक लखन गाडेकर , सूत्रसंचलन गजानन धांडे यांनी केले.