चंद्रपूर: अर्धनग्न अवस्थेत महिलेला चौकात मारहाण केल्याची संतप्त घटना समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी ४ आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. येथील पत्रकार परिषदेत आपली व्यथा सांगताना पीडित महिलेने आठवड्याभरातआरोपीला ताब्यात न घेतल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करू, असा इशारा दिला आहे.

आरोपी खंबाडा गावचा रहिवासी असल्याचे तिने सांगितले. ३१ ऑक्टोबर रोजी गावातच तिच्यावर अत्याचार झाला, तिने पोलिसांत तक्रार केली, त्याआधारे पोलिसांनी गावातीलच शेख उरफान विरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडितेचे म्हणणे आहे की, जेव्हापासून तिने बलात्काराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली, तेव्हापासून आरोपीचे कुटुंबीय तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर सतत दबाव आणत आहेत आणि सहमत नसल्याबद्दल भांडत आहेत.

हेही वाचा… …अन् जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेतला झाडू, वाचा कारण काय ते…

दरम्यान, २२ जून रोजी आरोपीच्या नातेवाईकांनी पीडितेला गावातील चौकात सर्वांसमोर अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण केली. फाटक्या कपड्यांसह वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार घेण्याऐवजी तेथे तैनात सहायक पोलिस निरीक्षक चवरे यांनी शिवीगाळ केली. पीडितेचे म्हणणे आहे की, वरोरा पोलिस ठाण्यातून सहकार्य न मिळाल्याने तिने थेट नागपुरात जाऊन विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार केली, त्यांच्या सूचनेवरून वरोरा पोलिसांनी अखेर ९ जुलै रोजी अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. शेख रिजवान, शेख मौसीम, शेख दानिश आणि शेख मोहम्मद यांचा समावेश आहे.

हेही वाचा… जावई बापूंना चांदीच्या ताटात सोन्याचा घास, पण अनारसे देतात भलताच ताप…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे, आरोपी वरोरा पोलीस स्टेशनचे एपीआय चावरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.त्यामुळे ते अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. आरोपी या आरोपींपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्याने सांगितले. आठवडाभरात आरोपींना अटक न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष पिऊन आत्महत्या करणार असून, त्यासाठी आरोपी आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे एपीआय जबाबदार राहणार असल्याचे तिने म्हटले आहे.