वर्धा: सीईटी कक्षाने एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी ७ जुलै पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

या मुदती नंतर नोंदणी व पडताळणी केलेल्या विद्यार्थ्याचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. पसंतीक्रम व पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक काही दिवसातच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा… नागपूर : ड्रग्स विक्रेत्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची निश्चिती करण्याची प्रक्रिया ८ जुलैला संपेल. ७ जुलै नंतर नोंदणी झालेल्या अर्जाचा विचार नॉन कॅप जागांसाठी केल्या जाणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर भेट देवून न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमएएच – एमबीए / एमएमएस – सीईटी २०२३ साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रवेशासाठी कोणतेही नोंदणी शुल्क पडणार नाही.