चंद्रपूर: युनायटेड किंग्डम येथे जगभरातून उच्च शिक्षणासाठी जाणा-या तरुणांना शिक्षणासह ज्यांच्या कामाचा सामाजिक प्रभाव तेथील सरकारवर पडतो, त्यांना ब्रिटीश सरकारच्या फॉरेन काॅमनवेल्थ डेवलपमेंट विभागाकडून गौरवण्यात येते. यंदा जगभरातील १६८ देशातील १६०० स्काॅलर्समधून चंद्रपूरचा दीपक ब्रिटिश सरकारचा ‘गोल्ड’मॅन ठरला आहे.

गडचांदूर येथील लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेणाऱ्या ॲड.दीपक यादवराव चटप या केवळ २६ वर्षीय भारतीय तरुण वकिलाला आंतरराष्ट्रीय संस्थांतील सामाजिक योगदानासाठी चेव्हनिंग गोल्ड व्हालंटरिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनमधील आंतरराष्ट्रीय संस्थांतील प्रभावशाली शैक्षणिक स्वयंसेवा योगदानाची जागतिक स्तरावर दखल झाल्याने देशाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.

Delhi High Court whatsapp hearing
व्हॉट्सॲप बंद होणार? केंद्र सरकारच्या मागणीचा विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

ॲड.दीपक चटप यांनी लंडनमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान सामाजिक न्याय, शांतता आणि मानवी हक्कांसाठी समर्पित आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी स्वेच्छेने सुमारे १६२ तास काम केले. ब्रिटन सरकारच्या फॉरेन कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट विभागातर्फे वर्षभर स्वयंसेवेसाठी असाधारण बांधिलकी दाखविणाऱ्या जगभरातील स्कॉलर्सतून हा पुरस्कार दिला जातो. नुकताच त्यांना हा सन्मान लंडन येथे प्रदान करण्यात आला. ॲड.दीपक चटप यांना गेल्या वर्षी ब्रिटीश सरकारने प्रतिष्ठेची ‘चेवनिंग’ शिष्यवृत्ती दिली होती, ज्यामुळे त्यांना लंडनमधील सोएस या जागतिक नामांकित विद्यापीठात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. या संधीचे सोने करत दीपकने जगभरातील स्काॅलर्सतून आपली छाप सोडली.

हेही वाचा… जेईई साठी नोंदणी सुरू; निकालाची तारीखही जाहीर

आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील ॲड.दीपक चटप यांनी चंद्रपूर-गडचिरोलीसह राज्यातील सामाजिक प्रश्नांवर केलेले कायदेविषयक रचनात्मक काम समाजाला प्रेरणादायी ठरले आहे. संविधानिक मुल्ये, विधायक धोरणे, ग्रामीण युवकांची शैक्षणिक क्षमता बांधणी, हक्क व अधिकाराविषयी कृती युक्त भुमीका दिशादर्शक ठरली आहे. लंडन येथे उच्चशिक्षणानंतर देश-विदेशात मोठ्या पगाराच्या संधी असूनही शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा, या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यात परत येवून रचनात्मक काम उभे करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

ॲड.दीपक चटप यांची लंडनवर छाप

वर्षभरात युनायटेड किंग्डम येथील ग्लासगो, बर्मीगम, कार्डीफ आदी ठिकाणी झालेल्या जागतिक परिषदेतील ॲड.दीपक चटप यांचा सहभाग महत्वपूर्ण ठरला. विशेषतः लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या जागतिक परिषदेत विशेष वक्ता म्हणून ॲड.दीपकने भूमीका मांडली. जगभरातील स्काॅलर्सचे नेतृत्व करत लंडनच्या संसदेत लोकप्रतिनिधी-स्काॅलर्स संवाद घडवून आणला. लंडनमध्ये भारतीय लोकशाही व आजची आव्हाने यावर परिसंवाद घडवून आणत जगभरातील स्काॅलर्सचे भारताविषयी लक्ष वेधले. अमेरिकेतील अनुदान, जागतिक व्यापार संघटनेची धोरणे व भारतातील कायद्यांचा कापूस उत्पादक शेतक-यांवर होणारा परिणाम या विषयावर दीपकने संशोधन केले असून लवकरच ते प्रसिद्ध होणार आहे.