नागपूर: दीक्षाभूमीचे विकास पर्व सुरू झाले असून आता २०० कोटी या कामासाठी दिले. जगातील लोकांनी या ठिकाणी भेट द्यावी यासाठी जागतिक दर्जाचाविकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने मंगळवारी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बौद्ध धम्म गुरु भन्ते सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, थायलंडच्या डॉ. अफिनिता चाईचाना, राजेंद्र गवई आणि स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, दीक्षाभूमीच्या विकासासाठी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा रा.सु. गवई, सदानंद फुलझेले यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेऊन विकास केला.

हेही वाचा… फूट पाडणाऱ्यांपासून सावध राहा! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन

आता राज्य सरकार दीक्षाभूमी जागतिक पातळीवरील धार्मिक स्थळ बनविण्याच्या तयारीत आहे. २०२४ पर्यंत म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत तेथील स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असेही फडणवीस म्हणाले. मी नागपूरचा पालकमंत्री आहे आणि दीक्षाभूमीही माझ्याच मतदार संघात येते..त्यामुळे २०० कोटी दिक्षाभूमीच्या विकासाच्या कामाला दिले आहे. लंडन मध्ये एक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार केले असून जपानमध्ये देखील डॉ. आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माच्या तत्वाचे संविधान दिले..भारताचे संविधान जगातले सर्वात चांगले संविधान असल्याचे फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले. पाटणा ,सारनाथ लुम्बिनी २२ हजार करोड चे काम पूर्ण झाले आहे. कार्यक्रमाचे संचालन विलास गजघाटे यांनी केले. यावेळी दीक्षाभूमी परिसरात २०० कोटीची विकास कामे करण्यात येणार आहे त्याचे सादरीकरण करण्यात आले.