गेल्या दीड महिन्यात नागभीड तालुक्यातील ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या गावातील चार जणांचे बळी घेणाऱ्या वाघाला आज, शनिवारी अखेर जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले. वन विभागाने या वाघाला बेशुद्ध करून पकडले.

हेही वाचा- धक्कादायक! नागपूरमध्ये चॉकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा; चॉकलेट देणाऱ्या आरोपीचा शोध सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागभीड तालुक्यात सतत वाघाचे हल्ले सुरू आहेत. परिसरात या वाघाच्या हल्ल्याच्या दीड महिन्यात चार घटना घडल्या. वनिता वासुदेव कुंभरे (पाहर्णी) ही महिला शनिवारी शेतात गवत आणण्यासाठी गेली असता वाघाने हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर ढोरपाजवळ असलेल्या टेकरी या शिवारात याच वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाली होती, तर याच आठवड्यात वाघाने ढोरपा येथील महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या अगोदर पान्होडी येथील गुराख्यास वाघाने ठार केले होते. त्यामुळे या परिसरांत वाघाची दहशत पसरली होती. आज वनविभागाने त्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले.