वर्धा : स्थानिक स्वागत कॉलनीत राहणाऱ्या दुर्गा रवींद्र पांडे या पतीसह बाजार व देवदर्शनासाठी दुचाकीने घराबाहेर पडल्या. घरी परतल्यावर काही वेळाने त्यांना गाडी दिसून आली नाही. लगेच त्यांनी सेवाग्राम पोलिसांना गाडी चोरी गेल्याची तक्रार दिली.

हेही वाचा – गडचिरोली : ‘एमआयडीसी’साठी जमीन देण्यास नकार, अधिग्रहणावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष

हेही वाचा – भंडारा : नर्सिंग महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, काहींची प्रकृती गंभीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपास सुरू केल्यावर ही गाडी येथील वडार झोपडपट्टीत राहणाऱ्या दशरथ कुराडे याने चोरल्याची माहिती मिळाली. त्याला हिसका बसताच त्याने चोरीची कबुली दिली. मात्र एक रहस्य पण सांगितले. पती रवींद्र यानेच गाडीची दुसरी चावी देत गाडी चोरण्यास सांगितले होते. ही गाडी वित्तीय कंपनीच्या कर्जावर घेतली असल्याने ती विकून दोघे पैसे वाटून घेवू, असे रवींद्र याने आमिष दिल्याचे दुचाकी चोर दशरथ याने कबूल केले. पोलिसांनी रवींद्र व दशरथ या दोघांनाही अटक केली आहे.