scorecardresearch

Premium

विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या! केंद्राने उचलले पाऊल; काय आहेत शिफारशी? जाणून घ्या…

देशभरात झालेल्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय असल्याचे आकडेवारीतून पुढे आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तसेच शालेय मुलांच्या आत्महत्या अधिक असल्याचे आढळून आले आहे.

increasing suicide of students
विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या! केंद्राने उचलले पाऊल; काय आहेत शिफारशी? जाणून घ्या… (प्रातिनिधिक छायाचित्र)

वर्धा : देशभरात झालेल्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय असल्याचे आकडेवारीतून पुढे आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तसेच शालेय मुलांच्या आत्महत्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्याची दखल घेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काही शिफारशी केल्या आहेत.

हेही वाचा – तब्बल एक ‘तपा’नंतर गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राला मंजुरी; कसे असेल स्वरूप? जाणून घ्या…

Suicide of minor married girl funeral was done mutual case was registered after two months
अल्पवयीन विवाहित मुलीची आत्महत्या; अंत्यविधी परस्पर उरकला; दोन महिन्यांनी गुन्हा दाखल
Shiv Sena city chief Kalyan Mahesh Gaikwad marathi news, mahesh gaikwad is now out of danger marahi news
कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड अतिदक्षता विभागातून बाहेर, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा डाॅक्टरांचा दावा
CAPF
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांनाही प्रोत्साहन, प्रसूती रजेसह ‘या’ सुविधाही मिळणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
Jail
व्हॉट्सॲपवर रामाचा फोटो शेअर करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, दलित विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा – चंद्रपूर : कार्यकारी अभियंत्याला उत्कृष्ट खड्डे सम्राट अभियंता पुरस्कार, मनसेचे अनोखे आंदोलन

समवयस्क मुलांशी तुलना टाळावी, शाळा स्तरावर वेलनेस टीमची स्थापना, स्वतःची हानी करण्याची मानसिकता झालेल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांचे समुपदेशन करण्याचे सुचविण्यात आले आहे. तसेच अपयश कायमचे समजून व शैक्षणिक कामगिरी हेच यशाचे एकमेव गमक समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शालेय वास्तूत उदास अंधारमय वातावरण असलेल्या भागात प्रकाशव्यवस्था करणे, बागबगीचे आणि अन्य परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना आहे. मुख्याध्यापकांनी स्कूल वेलनेस टीममध्ये समुपदेशक, शिक्षक, आरोग्य तज्ञ, नर्स व अनुषंगिक वर्ग ठेवून धोक्याची चिन्हे दिसणाऱ्या विद्यार्थ्यावर लक्ष ठेवून उपाय करण्याची शिफारस झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The increasing suicide of students is a matter of concern and the union ministry of education has suggested some recommendations pmd 64 ssb

First published on: 05-10-2023 at 11:51 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×