चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव व परिसरात आठवडाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. शुक्रवारी सकाळी त्याला सापळा लाऊन पकडण्यात आले.

हेही वाचा – बुलढाणा : पँथर सेना चढली टाकीवर! रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन

हेही वाचा – भंडारा : अवकाळीग्रस्तांच्या भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार… राज्यपालांची ग्वाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याने गावात प्रवेश करून पाळीव जनावरांना आपले भक्ष करण्याचा सपाटा लावला होता. यामुळे गावातील नागरिक घाबरले होते. या भीतीपोटी ग्रामस्थांनी घराबाहेर पडणे तसेच शेतकऱ्यांनी शेतात जाणेसुद्धा बंद केले. मात्र, वनविभागाने घटनेची गंभीरता लक्षात घेता रात्रीची गस्त वाढवीत बिबट्याच्या गावात ये-जा करण्याच्या मार्गावर ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावला होता. सकाळच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात यश आले. वेजगाव जंगलालगत असल्यामुळे अशा घटनेत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे..