वर्धा : येथील महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात पकडण्यात आलेल्या बिबट्याचा आज पहाटे मृत्यू झाला. त्यास दुपारी गोळीने बेशुद्ध करण्यात आल्यावर करुणाश्रम येथे नेण्यात आले होते.

हेही वाचा – ‘आयजी’चे बदली आदेश हवेतच; २८ दिवसानंतरही एलसीबीचे ‘पीआय’ कार्यमुक्त नाही

हेही वाचा – बुलढाणा : अतिवृष्टीचे तांडव, २१६ गावांना तडाखा, पाऊण लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पकडण्यात आले तेव्हाच तो अत्यंत थकलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे रक्तनमुने नागपूरला चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री साडेसात वाजता बिबट्या काहीसा शुद्धीवर आला होता. डॉ. जोगे त्याच्यावर उपचार करीत होते. तापाने फणफणत असलेल्या बिबट्यास झालेला कावीळ चवथ्या म्हणजे गंभीर टप्प्यात पोहोचला होता. रात्री उशिरा आलेल्या रक्त अहवालानुसार त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खालावले होते. अखेर पहाटे त्याने जीव सोडला, अशी माहिती करुणाश्रमचे आशिष गोस्वामी यांनी दिली. आता त्याचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.