जिल्ह्यात दोन दिवसांपासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून इरई धरण तुडुंब भरल्याने तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहे.सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपर्यंत आकाश स्वच्छ होते. मात्र, सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा आकाशात ढग भरून आले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली.

हेही वाचा >>> क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर दोन रशियन तरुणी देहव्यापार करण्यासाठी नागपुरात

मंगळवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस बुधवारी पहाटेपर्यंत सुरू होता. बुधवारी थोडावेळ पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एक वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.सततच्या पावसामुळे धरणात जलस्तर वाढला आहे. त्याचा परिणाम इरई धरणाचे सात पैकी १, ४ व ७ क्रमांकाचे तीन दरवाजे सायंकाळच्या सुमारास ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.