नागपूर: मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी. त्यांच्या खिशावर भार वाढणार आहे. सध्या बाजारात चांगली मागणी असलेल्या मद्याच्या एका ब्रॅण्डचे दर कंपनीने प्रतिबॉटल ( क्वार्टर) तीस रुपयांनी वाढवले आहे.दरवाढीचा बाजारपेठेतील परिणाम पाहून इतरही कंपन्या त्यांच्या मद्याच्या किंमतीत वाढ करू शकतात.

मद्य विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात मागणी असलेल्या ब्लेंडर स्प्राईड व्हीस्कीचे दर प्रती क्वॉर्टर ३३५ रुपयांवरून ३६५ रुपये करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना ३० रुपये अधिक मोजावे लागतील.एका कंपनीने दर वाढवले की इतर कंपन्या त्याची री ओढतात. असे झाल्यास इतरही कंपन्यांचे मद्य महागण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली. एकूणच काय तर मद्यप्रेमींचे खिशे नव्या दरवाढीमुळे अधिक रिकामे होणार आहे.