चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे प्रवाहीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) परिसरातून गेलेल्या गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याची पाळ फुटली. त्यामधील पाणी लगतच्या लखमापूर तलावात शिरले. त्यामुळे तलावाचा ओव्हर फ्लो फुटून वाहून गेलेल्या पाण्यामुळे ४० एकर शेतात पाणी घुसल्याने पिकासह शेती खरडून निघाली आहे. यामुळे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. शनिवारच्या रात्री मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले तलाव, लघू व मध्यम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली. मुसळधार पावसाचा वेग वाढतच राहल्याने नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) परिसरात निर्माणाधीन असलेल्या गोसेखूर्दच्या उजव्या कालव्याची पाळ फुटली. त्यामुळे तो पाणी लगतच्या लखमापूर परिसरातलील तलावात घुसला. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढून ओव्हर फ्लो फुटून लगतच्या सतीश पोशट्टीवार यांच्या शेतात घुसला. त्यामुळे नुकताच रोवणे करण्यात आलेले धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हेही वाचा >>>नागपूर: सौदी अरेबियातून दहशतवादी संघटनेशी जुळला अफसर, कोट्यवधीचा निधी जमवण्याची जबाबदारी

पिकासह शेतजमिनही खरडली आहे. उजवा काल वा व तलावाच्या फुटलेल्या ओव्हर फ्लोमधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धानपिकाचे ४० एकरातील नुकसान झाले आहे. शेती ही सतीश सुधाकरराव पोशट्टीवार आणि त्यांच्या इतर कुटूंबियांच्या मालकीची आहे. सुमारे चाळीस ते पन्नास एकर शेतीमध्ये नुकतीच धानपिकाची लागवड करण्यात आली होती. अतिप्रवाहीत पाण्यामुळे तलावातील गाळ, माती व चिखल शेतजमीन मध्ये साचल्याने शेती पिक घेण्यास योग्य राहिली नाही.