रेल्वेगाडीची प्रतीक्षा करत फलाटावर बसलेल्या प्रवाशांना तेथे अचानक साप दिसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. भीतीपोटी त्यांची पळापळ सुरू झाली. ही घटना नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहावर रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.जबलपूर एक्सप्रेस फलाटावर उभी होती. त्या बसण्यासाठी प्रवासी येत होते. अचानक मोठा साप तेथे आला. त्यांची लांबी सुमारे चार फूट होती. साप बघून प्रवासी भयभीत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवाशांची पळापळ सुरू झाली. एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला कळवले. पण कोणीही ज्सर्पमित्राला बोलवले नाही. साप रेल्वेस्थानकावरील एका बिळात शिरला.नागपूर रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात उंदीर आहेत. तसेच येथे सापही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. . यापूर्वी देखील येथे साप निघाले होते. प्रवाशांना त्यांची तक्रार केली आहे. पण साप पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The snake on the platform the passengers trembled incident at nagpur railway station tmb 01
First published on: 05-09-2022 at 13:29 IST